न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२२) :- एसबीआय क्रेडिट कार्डचे केवायसी अपडेट करण्याच्या आमिषाने शुक्रवारी आरोपीने फिर्यादी महिलेला फोन केला. महिलेला विश्वासात घेऊन फोनवर एक लिंक पाठवली आणि त्यात क्रेडिट कार्डची सर्व माहिती भरण्यास सांगितले.
महिलेने माहिती भरली असता आरोपीने त्या माहितीच्या आधारे महिलेच्या क्रेडिट कार्डवरून १७ हजार ५०० रुपये काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. १६) रावेत येथे घडला. महिलेने रोहित शर्मा नावाच्या व्यक्ती विरोधात रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.