न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२२) :- हिंजवडीतील एआरपी बांधकाम साईटवर सिक्युरिटी फिल्ड ऑफिसर म्हणून फिर्यादी काम करतात. त्या साईटवर सुरक्षा रक्षक कामावर होते.
शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षक हे अंघोळीसाठी गेले असता साईटवरील सेल्स ऑफिसमध्ये ठेवलेले एक लाख ८० हजार रुपये किमतीचे सहा एसी चोरट्यांनी चोरून नेले.
किरण स्वरूप साळुंके (वय ३५ रा. मुंढवा चौक, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.