न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२२) :- आपले सरकार पोर्टल, आपले सेवा सर्कल पोर्टल व सेवा हमी कायदा अंतर्गत देण्यात येणारे प्रमाणपत्र, ४२ ब सनद, ७/१२ प्रमाणपत्र, फेरफार, प्रलंबित प्रकरणे, अर्ज आदी कामकाजाच्या निपटारा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याकरिता वडमुखवाडीत आज सोमवारी (दि. १९) दुपारी तीन वाजता चंद्रफुल गार्डन, गोखले मळा शेजारी, आळंदी रोड या ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केला आहे. या दरम्यान शिबिराला नागरिकांनी उपस्थित राहून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन हवेलीतील अपर तहसीलदार गीता गायकवाड यांनी केले आहे.