न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रु.) :- कराड येथील, हुतात्मा अपंग कल्याणकारी बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा या वर्षीचा राज्यस्तरीय “सह्याद्री समाजगौरव पुरस्कार”* कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांना जाहीर झाला आहे.
साहित्य, सामाजिक व कामगार क्षेत्रातील दीर्घकाळ केलेल्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते शनिवार (दि.२३ फेब्रुवारी १९) रोजी (दुपारी ४.०० वा.) पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
हुतात्मा अपंग कल्याणकारी बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील फाडतरे यांनी निवड समितीच्या वतीने हा पुरस्कार जाहिर झाला केला असल्याचे पत्र बोऱ्हाडे यांना दिले आहे. अरुण बोऱ्हाडे यांच्या साहित्य, सामाजिक व कामगार चळवळीतील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.











