न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने आंतर शालेय समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत संचेती माध्यमिक विद्यालयाने चमकदार कामगिरी केली.
यावेळी माध्यमिक विभागातील तेजल शिंदे या विद्यार्थिनीने भावगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच समूहगीत स्पर्धेत गट क्र. ३ मध्ये माध्यमिक विभागाच्या ८ वी ते १० वी च्या विद्यार्थिनींनी (ये है नया हिंदुस्थान) हे समूहगीत गायन करून, द्वितीय क्रमांक मिळविला.
तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थिनींनी गट क्र. १ मध्ये समूहगीत (सारे जहॉ से अच्छा) हे गीत गात द्वितीय क्रमांक मिळविला. समूहगीत व भावगीत गायन करणाऱ्या विद्यार्थिनींनी इंगळे सरांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मोहनलाल संचेती व शाळेच्या सचिव वर्षा टाटिया व मुख्यध्यापिका तसेच सर्व विभागप्रमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.











