न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २१ फेब्रु.) :- पिंपळे सौदागर परिसरात नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांनी पुन्हा एक पाऊल स्मार्ट सिटीकडे वळवले आहे. याआधीही काटे यांनी पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, सायकल पॉईंटची सेवा सुरु केलेली आहे. ‘ग्रीन सौदागर, क्लिन सौदागर’ या उपक्रमांतर्गत प्रथमच पिंपळे सौदागर परिसरात इ-स्कुटर सेवा कार्यरत करण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्पा येत्या पंधरा दिवसात कार्यान्वित होणार असून, ट्रायल बेसेसवर २० ‘इ-स्कुटर’ चे नियोजन करण्यात आलेले आहे. ‘इ-स्कुटर Android App’ द्वारे चालु किंवा बंद करता येते. ही स्कुटर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे एका तासात ६० किमी चालवता येते. या इ-स्कुटरला चार्जिंगसाठी ४ ते ५ तास लागतात. इ-स्कुटरचा टॉप स्पीड हा २५ किमी प्रति तास आहे. यासाठी इ-स्कुटर पॉईंट आणि इ-स्कुटर चार्जिंग पॉईंटचेही नियोजन करण्यात आलेले आहे.
वाढती महागाई आणि वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा, याकरीता नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रथमच पिंपळे सौदागर वासियांसाठी ‘इ-स्कुटर’ प्रणाली सुरू करण्याचे ठरविले आहे. इ-स्कुटर चालवण्यासाठी पहिले १५ मि. राईड फ्री असून, त्यानंतर इ-स्कुटर चालवण्यासाठी १. ५० रु. प्रति मिनिट सेवा शुल्क आकारण्यात येणार आहे. पैसे अदा करण्यासाठी ‘UPI APP’ चा वापर करून, इ-स्कुटरचा आनंद नागरिकांना घेता येईल, अशी माहिती काटे यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना दिली आहे.











