- दोन वर्षांपासून तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- ” तु मला आवडतेस माझ्याबरोबर गाडीवर बस, माझे तुझ्यावर प्रेम आहे”, असे बोलून घरापासून महाविद्यालयापर्यंत आरोपी फिर्यादी तरुणीचा पाठलाग करायचा. फोनवरून बोलून फिर्यादी यांना सतत त्रास द्यायचा.
१७ सप्टेंबर रोजी फिर्यादीची आई त्यांना घेऊन परिक्षेसाठी गेल्या असता पेपर सुटताच फिर्यादी घरी जात असताना फिर्यादी यांचा हात पकडून तू मला आवडतेस, तु माझीच आहेस म्हणत त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच तुला व तुझ्या आईला बघून घेईन म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार २०१९ ते मंगळवारी (दि. २०) दोन वर्षापासून सुरु होता. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार अजिंक्य विजय उपाडे (रा. शांतीनगर, भोसरी) याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
















