न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- पिंपरीतील आंबेडकर चौक येथून फिर्यादी आणि त्यांचे चुलते सोमवारी रात्री पावणे दहाच्या दरम्यान शास्त्रीनगर येथे पायी चालत जात होते. थायसन ग्रुप कंपनीसमोरून जात असताना अनोळखी दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले आणि खिशातून २८ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून नेली.
सेहबुद सैफुद्दीन शेख (वय ३०, रा. शास्त्रीनगर, पिंपरी. मूळ रा. झारखंड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















