न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- ७ वर्षाच्या मुलीला आरोपीने मंगळवारी (दि. २०) दुपारी दीडच्या दरम्यान चॉकलेटचे आमिष दाखवले. स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर त्याने बलात्कार केला.
हा प्रकार आईला मुलीने सांगितले. पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. करीम कादर खान (वय ६० रा. दापोडी) याला भोसरी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिस पुढील तपास करत आहेत.
















