न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- चार महिलांना पैशाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. महिलांकडून स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेतला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मंगळवारी (दि. २०) सायंकाळी छापा मारून चार महिलांची सुटका केली.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्पा मॅनेजर खतिजा मोजिब खान (वय २१, रा. भोसरी), स्पा मालक अजय अरुण वाळके (वय ३२, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















