न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- चऱ्होलीतील लॉंग आईसलँड सोसायटीत फिर्यादी व त्यांचे सहकारी वॉचमन म्हणून काम करतात. ते ड्यूटीवर असताना मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास आरोपी दुचाकीवरून आले. सोसायटीचे गेट बंद असताना ते तोडून सोसायटीमध्ये त्यांनी प्रवेश केला.
यावेळी फिर्यादी यांनी त्यांना बाहेर काढले. याचा राग मनात धरून आरोपी व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्याला कोयत्याने व हाताने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
परमेश्वर शिवदासराव भोसरीकर (वय ३० रा. लोहगाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश शर्मा (वय २४ ) व त्याचे दोन साथीदार यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
















