न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- कॉलेजला चाललेल्या महाविद्यालयीन युवतीच्या दुचाकीला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. टेम्पोचे चाक तीच्या अंगावरून गेल्याने जागीच तीचा मृत्यू झाला. मारुंजी रस्त्यावरील मुरकुटे वस्ती येथे बुधवारी (दि. २१) सकाळी नऊच्या दरम्यान ही घटना घडली.
धनश्री भगवान राजेकर (वय १७, रा. मुकाई नगर, हिंजवडी) असे या आपघातात मृत्यू झालेल्या दुदैवी विद्यार्थीनीचे नाव आहे. तर टेम्पोचालक निंबा मुरलीधर गोसावी (वय. ३३, रा. नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. धनश्री ही मारुंजी येथील अलार्ड पब्लिक स्कुल ज्युनियर कॉलेजमध्ये इयता ११ वी सायन्स मध्ये शिकत होती.
















