न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- पत्नीचा सुरुवातीला दोरीने गळा आवळला. त्यानंतर डोक्यात दगडी पाटा घालून खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांचा मुलगा दुपारी दीडच्या सुमारास घरी आला असता दरवाजा आतून बंद होता. काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
शांताबाई शिवराय अहिवळे (वय ५२) असे खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर शिवराय तुकाराम अहिवळे (वय ६०, दोघेही रा. गंधर्व नगरी तापकीर नगर मोशी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















