न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी टाईप एक नावाचा फिर्यादी यांच्या मुलाला आजार आहे. त्या आजारावर उपयोगी ठरणारे जोलजेंस्मा नावाचे इंजेक्शन अमेरिकेतील नोवायटीस या कंपनीत मिळते. त्या कंपनीतून इंजेक्शन मिळवून देतो, असे आरोपीने फिर्यादी यांना अमिष दाखवले.
त्यासाठी फिर्यादीकडून तब्बल दीड कोटी रुपये आरोपीने घेतले. ती रक्कम अमेरिकेतील कंपनीला पाठवली नाही. फिर्यादी यांनी आरोपीला पैसे परत मागितले असता आरोपीने पैसे देण्यासाठी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच फोन बंद करून फसवणूक केली.
हा प्रकार २५ ऑगस्ट २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ या दरम्यान रावेत येथे घडला. अमित शांतारामजी रामटेककर (वय ३४, रा. पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात २० सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एस लक्ष्मी कंथन (रा. कोईम्बतूर, तामिळनाडू) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.


















