न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२२) :- स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे १७ कोटी रुपयांच्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.
प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर क्र. २३ मधील क्लोरिनेटर्सची सुधारणा करुन त्यांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. याकामी २ कोटी ३७ लाख खर्च अपेक्षित आहे.
पीएमपीएमएल संस्थेस सन २०२१-२२ या वर्षातील संचलन तूट रक्कम १० कोटी रुपये अदा करण्याच्या खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आजच्या बैठकीत मान्यता दिली.