न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी:- निगडी येथील चिंचवड मल्याळी समाजमच्या (सीएमएस) वतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय राजा रवी वर्मा चित्र प्रदर्शनाचे आज आकुर्डी येथे उदघाटन करण्यात आले.
यावेळी केरला ललित कला केंद्राचे एब्बी जोसेफ, सीएमएसचे अध्यक्ष पी. व्ही भास्करन, शाहीर अशोक कामथे, श्रावण जाधव, शिल्पकार संजय कुंभार, सीएमएसचे उपाध्यक्ष पी. श्रीनिवासन, खजिनदार के. व्ही. जनार्दनन, तसेच चित्र प्रदर्शनात प्रा. नितीन तावरे, रवींद्र मालवदे, रेश्मी बाफना, निताली हर्गुडे, मेघा मोहनन, वर्षा भिंगारे, माया उग्रन, पुर्वा गवळी, सुमा बाबू यांचे चित्रकार उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मान्यवर, चित्रकार व सीएमएस शाळेतील ३६ बाल चित्रकारांच्या कलाकृती पाहायला मिळल्या. इंटरमिजिएट स्पर्धेत राज्यात प्रथम आलेली पुर्वा गवळी हिने रेखाटलेली चित्रे प्रदर्शनाचे आकर्षण ठरले. यावेळी प्रा. तावरे यांनी चित्रकला क्षेत्रातसुद्धा नोकरीची संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या केरला भवनमध्ये प्रदर्शन सर्वांसाठी २७ तारखेपर्यंत विनामूल्य खुले आहे.











