न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २२ फेब्रु.) :- मोशी येथे गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर खराब असल्याने गॅस गळती होत असल्याची तक्रार फिर्यादी यांची बहीण रंजना यांनी वैष्णवी गॅस एजन्सीकडे केली. एजन्सीकडून नितीन हा फिर्यादीच्या घरी आला.
मात्र, त्याने रेग्युलेटर दुरुस्ती न करता गॅस चालु कऱण्यास सांगितला. त्यातून हा स्फोट झाला आहे, अशी तक्रार सुरेश भागुजी हिंगणे (वय- ५२ रा. मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी नितीन नागरगोजे (वय-२८) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.











