- कर्तव्यावर असताना झोपेत निद्रिस्त
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रु.) :- सध्या पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात वाहनाचे पासिंग करण्याची वेळ सकाळी दहा ते दोन पर्यंत आहे मात्र, अनेक वाहनांची पासिंग संध्याकाळी पाच ते सहा पर्यंत होत नाही. सदर पासिंग करण्यासाठी कार्यालयातून लॉट पाडले असून, प्रत्येक लॉट मध्ये वाहन निरीक्षकाला २५ वाहनांचे पासिंग करण्यात येते. मात्र, एक महिन्यापासून वाहनाचे पासिंग वेळेवर होत नसल्यामुळे वाहन मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहनाचे पासिंग वरून उच्च न्यायालयाने मोटार वाहन निरीक्षक यांना फटकारले आहे. यातील काही जणांना तर निलंबित पण केले होते, असे असूनसुद्धा काही वाहन निरीक्षक मोटार चालकांना वेठीस धरल्याचे चित्र दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा नेहमीच सावळा गोंधळ चर्चेत असतो. शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना वाहन परवाना व चाचणी देण्यासाठी येथील परिवहन कार्यालयात यावेच लागते. तसेच कार्यालयात कामासाठी गेल्यास ते सहज होतही नाही. त्यासाठी हेलपाटे मारावेच लागतात. काही वेळा कागदपत्राअभावी तर काही वेळा कार्यालयातील कर्मचाऱ्यांमुळे कामास विलंब होतो. असाच काहीसा प्रकार कार्यालयाबाहेर घडला असून, मो. वा. नि. रुपेश गायकवाड हे कर्तव्यावर असताना, पासींग टेस्ट ट्रॅकच्या कडेला एका वाहनात झोपलेल्या अवस्थेत आढळले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रविंद कुदळे यांनी पिंपरी-चिंचवड येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्र दिले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण सोमवार (दि. १८) रोजी आपल्या कार्यालयातील मो. वा. नि. रुपेश गायकवाड पासींग टेस्ट ट्रॅकच्या कडेला एका वातानाकुलीत वाहनात काचा बंद करून, सायंकाळी ४: ३५ मि. वाजता झोपलेल्या अवस्थेत आढळले आहेत. जुन्नर, खेड, मंचर, नारायणगाव, लोणावळा, मान, हिंजवडी आदि पंचक्रोशीतून नागरिक वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येत असतात. अशा वेळी टेस्ट ट्रॅकच्या कडेला रस्त्यावर पासींगसाठी जी वाहने उभी असतात, त्यामध्ये आपली कार वाहनांच्यामध्येच उभी करुन, कर्तव्यावर असताना वाहनात झोपणे कितपत योग्य आहे.
काही महिन्यांपूर्वी ५० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना योग्यता प्रमाणपत्राबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. ही बाब ताजी असताना सदर अधिकारी ट्रॅकच्या बाजूच्या रस्त्यावर बिनदिक्कतपणे वाहनामध्ये कामावर कार्यरत असताना, अशा प्रकारचे क्रूत्य करतोच कसा? हा निंदनीय प्रकार आहे, असे या पत्रात कुदळे यांनी नमूद केले आहे.











