न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २२ फेब्रु.) :- निगडी प्राधिकरणातील समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज मंदिर श्री गजानन महाराज उद्यान येथे रविवार (दि. २४) रोजी श्री गजानन महाराज (शेगांव) यांचा १४१ वा प्रगट दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी रविवार (दि. २४) रोजी सकाळी. ६:३० ते ९०० वाजता श्रींचा अभिषेक व आरती, सामुदायिक पारायण, भजन, आरती व सुगम संगीत तसेच श्रींची पालखी मिरवणूक होणार आहे.
हा महोत्सव सोमवार (दि. २५) ते (दि. ४ मार्च २०१९) यादरम्यान सुरु राहणार असून, या महोत्सवात श्रींच्या भक्तांसाठी विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तरी भाविकांनी या महोत्सवात सहभाग व्हावे, असे आवाहन श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व विश्वस्त व सभासद यांच्या वतीने करण्यात आले आहे.-











