- भाजपच्या पालकमंत्र्यांनी पत्रकाराला हुसकावले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२२) :- पुण्यातील बैठकीनंतर चंद्रकांत पाटील आपल्या वाहनात बसत होते. यावेळी एक पत्रकार त्यांच्याकडे प्रतिक्रिया घेण्यासाठी आला. संबंधित बैठकीत काय चर्चा झाली? याबाबत विचारलं असता, चंद्रकांत पाटलांनी पत्रकाराला हुसकावून लावलं. “काम नाही, धाम नाही, घरी जा…तुझी बायको वाट पाहतेय” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आले होते. पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच पुणे जिल्हा परिषदेची आढावा बैठक घेतली.
जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या तसंच राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा प्रत्येक महिन्यात घेण्यात यावा. तसेच जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
काम नाही, धाम नाही, घरी जा बायको वाट बघतेय. पुण्यात भाजप नेते चंद्रकांत पाटील मीडियावर भडकले. pic.twitter.com/ztUjK8ffGG
— Dnyaneshwar Pomane (@PomaneSpeaks) October 1, 2022















