न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२२) :- जीवनसाथी वेडिंग साईटवर फिर्यादीची आरोपीशी ओळख झाली. त्याने अमेरिकेतून गिफ्ट भारतात पाठवले असल्याचे सांगितले. फिर्यादी तरुणीला महिलेचा फोन आला. दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बोलत असल्याचे सांगत त्यांच्यासाठी अमेरिकेतून गिफ्ट आले आहे. त्यात महागड्या वस्तू असून कस्टम चार्ज भरावा लागेल असे सांगितले.
फिर्यादीने कस्टम चार्जच्या नावाखाली नाजीर अहमद नावाच्या बँक खात्यात ३८ हजार ५०० रुपये पाठवले. काही वेळाने तरुणीला पुन्हा फोन आला. त्या गिफ्टमध्ये २० हजार अमेरिकन डॉलर आहेत, त्यामुळे त्याचे सिक्युरिटी डिपॉझिट एक लाख ४८ हजार रुपये भरावे लागतील. फिर्यादींनी ते पैसे सैफ खान या नावाच्या खात्यात दोन टप्प्यात भरले. पैसे घेऊन तरुणीला गिफ्ट न देता फसवणूक केली.
ही घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. फिर्यादी तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ३) फिर्याद दिली आहे. यश अग्रवाल, एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.


















