- चिंचवडगावातील जैन शाळा परिसरातील घटना; आरोपीला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२२) :- चिंचवडगावातील जुना जकात नाका चौकात, ब्रीजच्या खाली अगदी रोडच्या मधोमध आरोपीने त्याची गाडी (एमएच १४ ईयु ००४८) उभी केली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. फिर्यादी ट्राफिक वॉर्डन यांनी आरोपीला गाडी काढा त्यामुळे वाहतुक कोंडी होत असल्याचे सांगितले. आरोपीने ‘ गाडी नाही घेत पुढे, काय करायचे ते कर ‘ असे उद्धट उत्तर दिले.
फिर्यादी यांनी आरोपीच्या गाडीचा फोटो काढला. याचा राग येवून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करीत गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीची कॉलर पकडून चापटा व हातातील कडे मारून जखमी केले. चिंचवड येथील जैन शाळा परिसरात सोमवारी (दि. ३) दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली.
ट्राफिक वॉर्डन शरद जयहिंद बंडगर (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाख केला आहे. हंसराज दगडु ठाकरे (वय ३८ रा. चिंचवडे नगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.


















