न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२२) :- पोलीस स्टेशनला वडीलांविरुध्द तक्रार दिल्याचा राग मनात धरत आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ, मारहाण केली. धमकी देवुन फिर्यादीच्या घराच्या गेटमध्ये घुसुन त्यांचे केस ओढले. डाव्या हातास व डोक्यात मारहाण करुन फिर्यादीच्या छातीवर हात ठेवुन त्यांचे ब्लाऊज ओढल्याने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होवुन त्यांचा विनयभंग केला.
फिर्यादीचा मुलगा सोडवण्यास आला असता त्यालाही हाताने मारहाण करुन, फिर्यादीचे हातातील मोबाईल घेवुन जमीनीवर आपटुन त्यांच्या मोबाईलचे नुकसान केले. तसेच ६.३० च्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर येवुन घरावर विटा फेकुन गेटचे व खिडकीच्या काचा फोडुन नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ८) दुपारी ३.३० व सायंकाळी ६ ३० च्या सुमारास औदुंबर कॉलनी, वाल्हेकरवाडी येथे घडली. याप्रकरणी पिडीत महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी सोन्या नवनाथ सलगर (वय २० वर्ष रा. औदुंबर कॉलनी, वाल्हेकरवाडी चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला अटके केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
















