न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील मुख्य पाईपलाईनचे लिकेज काढायचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. १३) रोजी शहरातील थेरगाव ग्रॅव्हीटी व रावेत किवळे ग्रॅव्हीटीवरील भागात सकाळचा पाणीपुरवठा होईल. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
त्यामुळे थेरगाव, काळेवाडी, विजयनगर, रहाटणी, वाकड, पिंपळे सौदागर कुणाल आयकॉन टाकीवरील भाग, पिंपळे निलख, विशालनगर, पुनावळे, ताथवडे, रावेत से. २९ च्या टाकीवरील भागासह, किवळे, मामुर्डी, विकासनगर, जिल्हा रुग्णालय व उरो रुग्णालय सांगवी, बालेवाडी स्टेडियम, निगडी प्राधिकरण, से.क्र.२१ ते २८, आकुर्डी, खंडोबा माळ, मोहननगर, रामनगर, संभाजीनगर, शाहूनगर, कृष्णानगर, इंद्रायणीनगर, पांजरपोळ, सेक्टर १२, बोहाडेवाडी, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, जाधववाडी, कुदळवाडी, फुलेनगर, शिवतेजनगर, पूर्णानगर, शरदनगर, सुदर्शननगर, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, पवार वस्ती, रुपीनगर, चिखली या भागांतील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
(दि. १३) रोजी या भागांमध्ये म.न.पा. मार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील उपरोक्त भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरूस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील उपरोक्त भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि. १४) रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होईल. नागरिकांनी म.न.पा. कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे कळविले आहे.















