न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२२) :- प्रॉपर्टीच्या कारणास्तव फिर्यादी व तीचा मुलगा घरी असताना फिर्यादीची आरोपी मुलगी व आरोपी जावई यांनी फिर्यादीच्या घरामध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केला.
फिर्यादी व मुलगा विनोद यास लाकडी प्लॉवर पॉटने व हाताने लाथाबुक्यानी मारहाण करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार (दि.२२/०९/२०२२) रोजी १२.१५ वा. च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी घडली.
याप्रकरणी महिलेने सांगवी पोलिसात फिर्यादी दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी जावई सनी भारत गोंधळे (वय ३६ वर्षे, रा. वाकड पोलीस लाईन) व एक महिला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















