न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२२) :- श्री स्वामी समर्थ हार्ट केअर अॅण्ड ट्रामा सेंटर नावाची फिर्यादी व आरोपींनी भागीदारीमध्ये संस्था स्थापन करीत हॉस्पीटल चालवीले. हे हॉस्पीटल महाराष्ट्र शासनाच्या कर्मचारी राज्य विमा निगम – एम्प्लॉईज स्टेट इन्श्युरंन्स कॉर्पोरेशन (ई.एस.आय.सी.) योजनेसाठी प्रायमरी हॉस्पीटल म्हणुन सलग्न केले. फिर्यादी हे (दि. १४/०३/२०२०) रोजी बीड येथे गेले. करोनामुळे तिकडे अडकले. आरोपी भागीदार हीने तीचा नवरा डॉ. विलास सोमनाथ गिरी यांच्यासह कट करीत मुळ भागीदारी संस्था श्री स्वामी समर्थ हार्ट केअर अॅण्ड ट्रामा सेंटरच्याच नावाने स्वतःचे नाव व डॉ. विलास सोमनाथ गिरी असे दोघा भागीदारांच्या नावाने दुसरी भागीदारीपत्र नोटराईज केली.
या भागीदारपत्राच्या आधारे बँक ऑफ इंडिया येथे दुसरे चालु खाते उघडुन फिर्यादीच्या मुळ भागीदारी संस्थेच्या व्यवसायाचे ई.एस.आय.सी. योजनेच्या बीलाचे सुमारे १,४७,५९,१२९/- रुपये नवीन खात्यात वळवुन घेतले. हे पैसे फिर्यादीच्या संमतीशिवाय काढुन घेत फिर्यादीची फसवणुक केली. तसेच डॉक्टर रविंद्र इंगळे यांचे एम.बी.बी.एस. सर्टिफिकेट व इतर कागदपत्राचा संमतीवाचुन वापर करुन त्यांचीही फसवणुक केली.
हा प्रकार दि. १४/०३/२०२० ते १३/०९/२०२१ दरम्यान नोटरी टाकळकर यांचे कार्यालय, वेदांत संकुल, चाकण व बँक ऑफ इंडिया, चाकण बॅच येथे घडला. संजीव राजेंद्र भारती (वय ४३ वर्षे रा. माऊली निवास, तिरुपती कॉलनी, पांगरीरोड, बीड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी महीला (वय ४४), विलास सोमनाथ गिरी (वय ५२ वर्षे दोघे रा. आरोग्यम हॉस्पीटलच्या पाठीमागे, निघोजे रोड, नाणेकरवाडी, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.















