- हातामध्ये तलवारी घेत दोघांची चिंचवडमध्ये दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२२) :- हातामध्ये तलवार घेवुन ” आम्ही इथले भाई असुन आम्हाला कोणी नडला तर त्याला कापून टाकू ” असे बोलून मोठमोठयाने ओरडुन व शिवीगाळ करुन परिसरात दहशत माजवली. आरोपींनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) च्या पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केले.
हा प्रकार (दि १२) रोजी रात्री ९.२० वा. च्या सुमारास चिंचवडगाव, पत्राशेड, लिंकरोड येथे घडला. याप्रकरणी शस्त्रविरोधी पथकाचे पो. कॉ. मोहसिन युनिस आत्तार (वय ३१ वर्षे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी इरफान शाहनवाज शेख (वय ३१ वर्षे, रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड), आकाश राजु काळे (वय-३० वर्षे, रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) यांना पोलिसांनी गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतले आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.















