- शहरातील १४ संघटीत टोळ्यांमधील १०१ गुन्हेगारांवर मोका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी, निगडी, चिंचवड, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयत्यासारखी जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न करणे, दंगा करून गंभीर दुखापत, जबरी चोरी, गर्दी मारामारी, व बेकायदेशीररित्या विनापरवाना घातक शस्त्रे जवळ बाळगणे यासारखे गुन्हे करणारा कुप्रसिध्द गुन्हेगार राहुल ऊर्फ दगड्या बाबुराव टोणपे (वय २७ वर्षे, रा. मिलींदनगर, पिंपरी) याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी एम.पी.डी.ए. कायद्याखाली स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे (दि. १३) स्थानबध्द करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा अभिलेख तपासून त्यांच्यावर परीणामकारक व कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिसांना दिलेले आहेत. त्याप्रमाणे कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
कुप्रसिध्द गुन्हेगार टोणपे याने पिंपरी, निगडी, चिंचवड, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१६ पासून आत्तापर्यंत १६ गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याच्या गुन्हयांचा चढता आलेख पाहून पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार व. पो. नि. शंकर आवताडे, पिंपरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. अनिरूध्द सावर्डे, पो. ना. ओंकार बंड, म. पो. ना. माया कोल्हे, पिंपरी पोलीस ठाणे यांच्या पथकाने टोणपे याच्यावर एम पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, मंचक इप्पर पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्फत पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्याकडे सादर केला होता. प्रस्ताव सादर करण्याची कामगीरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), पद्माकर घनवट, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पोलीस हवालदार, सचिन चव्हाण, पो.ना. कारभारी पी.सी.बी. गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सन २०२२ मध्ये एम.पी.डी.ए. अंतर्गत आजपर्यंत राहुल ऊर्फ दगड्या बाबुराव टोणपेसह मेहबुब दस्तगीर पटेल-वाकड पोलीस ठाणे, दिपक सुरेश मोहिते-पिंपरी पोलीस ठाणे, अक्षय ऊर्फ जोग्या हेमंत जाधव-सांगवी पोलीस ठाणे या गुंडांवर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.
मोका अंतर्गत १४ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील १०१ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यात आकाश उत्तम शिनगारे, वय २४ वर्षे, रा. भिम शक्तीनगर झोपडपट्टी, मोरेवस्ती, चिखली, पुणे, (टोळी प्रमुख) व इतर ३ चिखली पोलीस ठाणे, लक्ष्मण बाबुराव धोत्रे, वय-३४ वर्षे, रा. शेल पिंपळगाव, खेड, पुणे. (टोळी प्रमुख) व इतर ०६ चाकण पोलीस ठाणे, रामदास मारुती साळुंखे, वय-३३ वर्षे, रा. दवणेवस्ती, आंबेठाण, खेड (टोळी प्रमुख) इतर ४ चाकण पोलीस ठाणे, देवा ऊर्फ देवानंद भिमाशंकर जमादार, वय २२ वर्षे, रा. दांगटवस्ती, दत्तनगर किवळे, देहूरोड (टोळी प्रमुख) व इतर ८ देहुरोड पोलीस ठाणे, अमित भुरेलाल सौदे, वय २५ वर्षे, रा. साईबाबा मंदिराजवळ, आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी, (टोळी प्रमुख) व इतर ०५ पिंपरी पोलीस ठाणे, गणेश हनुमंत मोटे, वय २३ वर्षे रा. कवडेनगर, गल्ली नं ३, सांगवी (टोळी प्रमुख) व इतर १३ सांगवी पोलीस ठाणे, अरुण बिपीन परदेशी, वय-२१ वर्षे, रा. बौध्दनगर, बि.नं. १६ चे पाठीमागे हनुमान मंदिराजवळ, पिंपरी (टोळी प्रमुख) व इतर ५ पिंपरी पोलीस ठाणे, सनी ऊर्फ सोन्या सुरेश शिंदे, वय-२९ वर्षे, रा. कान्हेवाडी, चाकण, खेड, (टोळी प्रमुख) व इतर ३ चाकण पोलीस ठाणे, सागर ऊर्फ बबल्या बापू खताळ, वय-२३ वर्षे, रा. ड्रायव्हर कॉलनी, काळेवाडी फाटा, थेरगांव (टोळी प्रमुख) व इतर ४ वाकड पोलीस ठाणे, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड, वय ३६ वर्षे, रा. आय.टी.आय रोड, औघ. पुणे. (टोळी प्रमुख) व इतर ५ सांगवी पोलीस ठाणे, निहालसिंग गिरवर गुदेन, वय-३४ वर्षे, रा. ओड, ता. सोनकच्छ जि. देवास, मध्यप्रदेश (टोळी प्रमुख) व इतर १० शिरगांव पोलीस ठाणे, अनिल उर्फ संतोष उर्फ अन्या गोरख जाधव, वय-३० वर्षे, रा. सोपान नाना बालघरे यांची रुम, बालघरे वस्ती. कुदळवाडी, चिखली (टोळी प्रमुख) व इतर ६ पिंपरी पोलीस ठाणे, आदर्श ऊर्फ छोट्या अशोक मगर, वय २१ वर्षे, रा. बि.नं. ९/बी/१०/११. राहुलनगर, निगडी (टोळी प्रमुख) व इतर ०९ निगडी पोलीस ठाणे, जितेंद्र ऊर्फ जित्या आनंदा जाधव वय २१ वर्षे रा. चिकन चौक संग्राम नगर झोपडपट्टी, ओटास्कीम निगडी (टोळी प्रमुख) व इतर ६ पिंपरी पोलीस ठाणे या १४ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील १०१ गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये प्रभावी कारवाई करण्यात आलेली आहे.















