- तरुणाकडे खंडणीची मागणी अनं लोखंडी हत्याराने मारहाण…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२२) :- मित्राबरोबर फुटबॉल खेळत असताना फिर्यादीकडून उभ्या असलेल्या बुलेट मोटारसायकला चुकुन बॉल लागला. त्यावेळी आरोपी दोघेजण तिथे आले. त्यांनी तु माझ्या गाडीला बॉल का मारला? अशी फिर्यादीला विचारणा केली होती. या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी हे त्यांच्या मित्र-मैत्रिणी बरोबर गप्पा मारत असताना फिर्यादीस ” भांडणे मिटवायचे असतील तर मला एक पेटी दे ” असे बोलून खंडणी मागितली.
आरोपीने हाताने, लाथाबुक्यांनी फिर्यादीला मारहाण करुन त्याच्या जवळील लोखंडी हत्यार फिर्यादीच्या डोक्याच्या पाठीमागील बाजुस मारुन जखमी केली. सह आरोपी आणि त्याचे इतर दोन साथीदार यांनी मिळुन फिर्यादीला हाताने व लाथा बुक्यांनी मारहाण केली. हा प्रकार (दि. १३) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान कास्क अॅन्डक्रेडट, किवळे येथील कॉफि शॉपमध्ये घडला.
याप्रकरणी पृथ्वीराज दत्तात्रय पाटील (वय २३ वर्षे, रा. कुटे वृंदावन, विठ्ठल मंदीराच्या मागे, विठठलवाडी, आकुर्डी) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी मिया युसुफ खान (रा कृष्णनगर, एम बी कॅम्प, देहुरोड), हसन शेख (रा कृष्णनगर, एम बी कॅम्प, देहुरोड), स्वस्तिक गणेश शेट्टी (रा. बेलबॉन्ड लोढा सोसा, प्लॅट नं २३०८, टॉवर नं २८, गहुंजे), इतर दोन साथीदार (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मिया युसुफ खान आणि हसन शेख (रा कृष्णनगर, एम बी कॅम्प, देहुरोड) यांना सी.आर.पी.सी. ४१ (अ) (१) प्रमाणे नोटीस दिली आहे.


















