- थकीत करापोटी विभागाची कारवाई; चिखली-भोसरी मंडल कर्मचाऱ्यांचा सहभाग…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागांतर्गत येणाऱ्या तळवडे कर संकलन विभागाकडून थकीत मिळकत धारकांकडून वसूलीची जोरदार मोहिम उघडली आहे. या मोहिमेंतर्गत करआकारणी व करसंकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांच्या आदेशावन्वये व प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नेतृत्वाखाली तळवडे करसंकलन विभागाचे सहा. मंडलाधिकारी संजय तळपाडे यांनी ही कारवाई केली.
या वेळी चिखली कर संकलन विभागाचे संजय लांडगे, भोसरी विभागाचे विजयकुमार बोठे, गट लिपिक प्रविण ऊघडे, अमर निकाळजे, आकाश चव्हाण, संजय जगदाळे, शिवाजी सुर्यवंशी, श्रीकांत कदम, सुरक्षा बलाचे जवान तसेच मोठ्या प्रमाणात फौज फाटा उपस्थित होता.
दरम्यान अनेक वर्षापासून कर भरत नसलेल्या थकित कंपन्याला विभागाकडून टाळे लावण्यात आले आहे. तर शाळा, संस्था व मिळकतधारकाकडून थकीत करांची वसुली करण्यात आली आहे. ही वसुली रोख रक्कम व धनादेशाव्दारे वसुल करण्यात आली आहे. तळवडे विभागाच्या या धडक मोहिमेमुळे थकीत मिळकत धारकांचे धाबे दणाणले असून ही कारवाई मार्च नाही तर सततच सुरु राहणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच शास्ती सोडून पैसे भरून घेतले जात असल्यामुळे मिळकत धारकांनी नागरीकांनी याचा त्वरीत लाभ घेण्याचे आवाहन कर विभागाचे प्रशासन अधिकारी नाना मोरे यांनी मिळकत धारकांना केले आहे.
















