न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२२) :- लग्नाचे अमिष दाखवुन फिर्यादीच्या ओळखीचा फायदा घेत जबरदस्तीने इच्छा नसताना वेळोवळी पीडित तरुणीशी आरोपीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार ऑगस्ट २०२० ते सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरु होता.
ही घटना देहुगाव येथील आरोपीच्या बहिणीच्या घरी व पडगा तळोजा एम.आय.डी.सी. जवळ न्यु पनवेल ता. पनवेल जि. रायगड येथे घडली. या प्रकरणी २३ वर्षीय पीडित तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी आरोपी अभिजीत विश्वास पाटील (वय माहीत नाही, रा. देहुगाव, मुळ रा. वाठार ता. कराड, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.
















