- काळेवाडीतील घटना; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२२) :- कॅमेरा भाडयाने घेत आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फसवणुक करण्याच्या उद्देशाने दोन लाखांचा काळ्या रंगाचा कॅनॉन ५ डी मार्क फोर कॅमेरा, तीस हजारांचा काळ्या रंगाचा २४-१०५ कॅनॉन लेस, आठ हजार रुपये किंमतीचा काळ्या रंगाचा ५० एमएम लेन्स, पाचशेची बॅटरी, दोन हजारचा एक चार्जर, तीन हजारांची बॅग, २५०० रु. किंमतीचे ६४ जेबी सॅण्डीक्स कंपनीचे मेमरी कार्ड, असे एकूण २,४६,००० रु. किंमतीचा मुद्देमाल फिर्यादीकडुन घेतला. तो परत न करता फिर्यादीची फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. १५) रोजी १० च्या सुमारास बाळु उत्तम भागवत यांचा फ्लॅट, सुलभ कॉलनी गजानननगर बिल्डींग एल-१३ तिसरा मजला, काळेवाडी फाटा काळेवाडी येथे घडला. फिर्यादी दत्तात्रय तुकाराम येवले (वय ३६ वर्षे, रा. बाळु उत्तम भागवत यांचा फ्लॅट, सुलभ कॉलनी गजानननगर, बिल्डींग एल-१३, तिसरा मजला, काळेवाडी फाटा, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी आरोपी सय्यद मोहमंद झिबिउल्ला (वय २७ वर्षे, रा. वाघोली, पुणे) व त्याचा साथीदार नाव, पत्ता माहीत नाही (वय अंदाजे २२ वर्षे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहे.