न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागेत महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने हंगामी देशी झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी ३३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. शोभिवंत वृक्ष लावून शहराचा कायापालट करण्यासाठी उद्यान विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
रस्त्याच्या कडेने व मोकळ्या जागेत देशी झाडे लावण्यासाठी उद्यान विभागाने ४० लाख खर्चाची निविदा काढली होती. त्यात चार निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी जी. बी. एन्टरप्रायजेस, बीव्हीजी इंडिया व बी. व्ही. रेड्डी कन्स्ट्रक्शन या तीन निविदा पात्र ठरल्या. त्यातील जी. बी. एन्टरप्रायजेस त्यांची १७.९१ टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. एका महिन्यात ही सर्व झाडे लावण्यात येणार आहेत.
त्यासाठी ४७ लाख ९ हजार खर्च अपेक्षित आहे. हे कामही जी. बी. एन्टरप्रायजेस यांना देण्यात आले आहे. कामाची मुदत १४ महिने आहे. ठेकेदाराची १.७० टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे
ट्रस्टला दिली मुदतवाढ
गजानन महाराज ट्रस्टला ७ सप्टेंबर २०२१ पासून दरमहा ३० हजार रुपये उद्यान देखभाल कामाचे मानधन देण्यात येत आहे. ट्रस्टला ११ महिने मुदतीसाठी हे काम थेट पद्धतीने देण्यात आले होते. ती मुदत ७ ऑगस्ट २०२२ ला संपली आहे. गजानन महाराज ट्रस्टला ५ महिने मुदतवाढ दिली आहे.