न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२२) :- रेल्वेने प्रवास करीत असताना झालेल्या ओळखीतून आरोपीने ‘ द स्कॉटीश सेलमन कंपनी, स्कॉटलँड ‘ येथे फिर्यादी यांच्या भावाला नोकरी लावुन देतो, असे आमिष दाखवले. आरोपीने वेळोवेळी ८,२०,००० रुपये कोटक बँक, शाखा आँध, पुणे येथील फिर्यादी यांचे खाते क्रमांक ८६१२२६९७१६, फिर्यादीची आई हिचे कॉसमॉस बँक, शाखा खडकी, पुणे येथील खाते क्र. ००२०५०१०२२१८१ व स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा नवी सांगवी येथील फिर्यादीचे भाऊ यांचे खाते क्र. २०२१५५२१७३७ या खात्यातुन आरोपीच्या शामराव विठ्ठल को- ऑपरेटिव्ह बँक, शाखा वसई, नवी मुंबई येथील खाते क्र. १०२४०३१३०००२६११ या खात्यात ऑनलाईनद्वारे ट्रान्सफर केले.
आरोपीने स्कॉटलँड येथे नोकरी न लावता तसेच फिर्यादी यांनी ऑनलाईनद्वारे दिलेले पैसे परत न देता फसवणुक केली. हा प्रकार सप्टेंबर २०१९ ते आजपावतो ऑनलाईनद्वारे घडला.
२३ वर्षीय महीला फिर्यादी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी सतनाम सिंग उर्फ राजीव शर्मा (रा. वेस्ट मुंबई, मोबाईल नंबर ९८६७३६७७०१ / ९३२१०३४६०३) याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.