- तरुणीचे मित्र-मैत्रिण आणि आई वडिलांशी उद्धट वर्तन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२२) :- इंस्टाग्राम अकांऊटवरुन आरोपीने फिर्यादीसोबत ओळख केली. त्यानंतर मैत्री आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु, कॉलेजला अॅडमिशन घेतल्यानंतर अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी आरोपीकडे फिर्यादी तरुणीने दुर्लक्ष केले. बोलणे बंद केले. त्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी तरुणीला राधा चौक, म्हांळुगे येथे थांबवले.
फिर्यादी तरुणीला अश्लिल शिवीगाळ करुन धमकी दिली. फिर्यादीला दिलेला फोन न सांगता आरोपी घेवुन गेला. त्या फोनवरुन आरोपीने फिर्यादीचे मित्र-मैत्रिण यांना फोन केला. फिर्यादीविषयी वाईट वाईट बोलला. फिर्यादी तरुणीच्या आई वडीलांना फोनवरुन “ तुमची मुलगी कॉलज गेटच्या आत कशी येते तेच बघतो, तिला मारुनच टाकतो ” अशी धमकी देत, फिर्यादीची इच्छा नसताना वांरवार फोन करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार २०२१ ते ३ ऑक्टोबर २०२२ दरम्यान राधा चौक, म्हाळुंगे येथे घडला. १९ वर्षीय फिर्यादी पीडीत तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मोतीलाल चव्हाण (वय २१ वर्षे, रा. कात्रज, मुळगाव मैलारम तांडा, ता. वकाराबाद, हैद्राबाद) असे गुन्हा दाखल तरुणाचे नाव आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.