न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२२) :- दिड वर्षाच्या मुलीला फ्लॅटच्या गॅलरीमध्ये खेळवत असताना त्यांच्या फ्लॅटच्या समोरील गॅलरीत उभे राहुन आरोपीने फिर्यादीकडे वाईट नजरेने पहिले. विकृत कृत्य करीत ” मला तु आवडते, मला तुच पाहिजे, तु मला हो म्हण” असे म्हणत फिर्यादीकडे लैंगिक संबंधाची मागणी केली. फिर्यादीच्या मनास लाज वाटेल असे कृत्य केले.
हा प्रकार (दि १५) रोजी सायंकाळी पाचच्या समारास स्वप्नील सोरटे यांच्या खोलीत भादवाने, आर्या गणेश सोसायटी, आगरकरवाडी रोड, मनशक्ती केंद्रासमोर, चाकण) येथे घडला.
२५ वर्षीय महिला फिर्यादी यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी उज्वल शिवाजी भोसले (वय २१ वर्षे रा. फ्लॅट नं. बी/१०५, आर्या गणेश सोसायटी, आगरकरवाडी रोड, मनशक्ती केंद्रासमोर, चाकण) याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.