न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रु.) :- दि. इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्षपदी सी. ए. संतोष संचेती यांची निवड करण्यात आली. निगडी येथील संस्थेच्या कार्यालयात नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणूकीत त्यांची निवड जाहीर करण्यात आली.
संस्थेने नियुक्त केलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये सी. ए. सिमरन लीलवानी (उपाध्यक्ष), सी.ए. पंकज पाटनी (सेक्रेटरी ), सी. ए. सचिन बन्सल (खजिनदार ), सी. ए. विजयकुमार बामने (अध्यक्ष विद्यार्थी संघट ना), सी. ए. चंद्रकांत काले आणि सी. ए. शैलेश बोरे (कार्यकारी मंडळ सदस्य) यांचा समावेश आहे.
करविषयक ज्ञान प्रसार, परिसंवाद, कार्यशाळा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि इतर समाजउपयोगी उपक्रम वर्षभर राबविण्याचा संकल्प असल्याची माहिती अध्यक्ष सी.ए. संतोष संचेती यांनी दिली.











