न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रु.) :- कराड येथील, हुतात्मा अपंग कल्याणकारी बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा राज्यस्तरीय “सह्याद्री समाजगौरव पुरस्कार” कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांना जाहीर झाला आहे.
सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते शनिवार (दि. २३) रोजी पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
साहित्य, सामाजिक व कामगार क्षेत्रातील दीर्घकाळ केलेल्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.











