न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२२) :- सोन्यासारखी दिसणारी दोन किलो मण्याची लगड दाखवली फिर्यादीला आरोपींनी विश्वासात घेतले. आरोपींनी फिर्यादी यांना खरे सोने न देता गोल्ड कोटेड मुलमा लावलेले खोट्या सोन्याचे मणी देत ४ लाखांची फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. १७) रोजी पाचच्या सुमारास सात्वीक फुडस, पॉवर हाउस चौक, चिंचवड येथे घडला. फिर्यादी शाम श्रीराम खर्डे (वय ६३ वर्षे, रा. यशोवेल सोसायटी, फलॅट नंबर ८, तानाजीनगर, प्रदीप स्वीट समोर लिंक रोड) यांनी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आरोपी रोहीत नावाचा मुलगा (वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे), अनोळखी मुलगा (वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे), एक अनोळखी महीला (वय ७० वर्षे), तिन अनोळखी ओढणी डोक्यावर घेतलेले इसम यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















