न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२२) :- रस्त्यांवर मोकाट जनावरे सोडणाऱ्या जनावरांच्या मालकांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लंपी हा आजार संसर्गजन्य असून यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. लंपीचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक रस्त्यावर वाहनांना आणि पादचारी नागरीकांना मोकाट जनावरांचा त्रास होऊ नये, वाहनांचे अपघात या गोष्टी लक्षात घेता जनावरे रस्त्यांवर मोकाट सोडल्यास गुन्हा दाखल केला जात आहे.
मोकाट जनावरे सोडणाऱ्या अज्ञात मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोकाट जनावरे सोडणाऱ्या अज्ञात मालकांचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अस वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे.
















