न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२२) :- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या मुलींकडुन वेश्याव्यवसाय करुन घेणा-या तसेच जास्त पैशाचे अमिष दाखवुन वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दलालावर अनैतिक मानवी वाहतुक विभागातील पोलिसांनी (दि. १९) रावेत पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई केली आहे.
आरोपी पुजा उर्फ चंदा रामनरेश विश्वकर्मा (वय २५ वर्षे, रा. सध्या ओपल इन हॉटेल, वडगांव शेरी, पुणे, मुळ रा. रामनरेश विश्वकर्मा, शिवशक्ती नगर, न्यु ३ लिंक रोड, मलिका अर्जुन जवळ, दहिसर ईस्ट, मुंबई) हिला ताब्यात घेतले आहे. रावेत पोलीस स्टेशन येथे गुरनं १०२/२०२२ भादवि कलम ३७० (३), सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा नावाने आरोपी महिला मोबाईल कॉल व व्हॉट्सअॅप कॉलद्वारे गिर्हाईकाशी संपर्क साधत हॉटेल व लॉजेसवर मुलींना स्वत: घेवुन जात. त्यातील एका मुलीची निवड करण्यास सांगुन वेश्या व्यवसाय करवुन घेत असे. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या नावाने हॉटेलमध्ये रुम बुक करुन सापळा रचला. पोलिसांनी छापा टाकुन महिला आरोपी पुजा हिला ताब्यात घेत दोन पिडित मुलींची वेश्याव्यवसायातुन सुटका केली आहे. पिडीत दोन्ही मुली या नेपाळ व मुंबई येथील आहेत. महिला आरोपीकडून पोलिसांनी ३००० रुपये रोख रक्कम, ३० रु किंमातीचे इतर साहित्य, ५,००० रु. कि. चा एक मोबाईल फोन जु.वा.कि.अं.असा एकुण ८,०३० रु कि.चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास रावेत पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अकुंश शिंदे सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री डॉ. संजय शिंदे सो, मा. पोलीस उप आयुक्त, (गुन्हे). श्री. डॉ. काकासाहेब डोळे, सो., मा. सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) श्री. डॉ. प्रशांत अमृतकर, सो., यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण, पोउपनि विजय कांबळे, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे यांनी केली आहे.
















