न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२२) :- चारित्र्यावर संशय घेतला. दोन्ही अपत्य मतीमंद झाले. या कारणावरून पत्नीला आरोपी पतीने हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी करीत फिर्यादीच्या बहिणीचा खून केला. मैना सतिष जाधव (वय ३५ वर्ष) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
हा प्रकार (दि. १९) रोजी दोनच्या सुमारास खेड तालुक्यातील मौजे कुरुळी गावच्या हद्दीत, कुरुळी फाटा येथील पुणे नाशिक हायवे रस्त्यालगत असलेल्या मंगलमुर्ती कॉलनीतील शैलेष बाळु पाटील यांच्या राहते घराचे वरील मजल्या वरील सिंगल रुममध्ये घडला.
रुषिकेश भारत थिटे (वय २३ वर्ष, सध्या रा. थेरगाव, डांगेचौक, फलॅट नं -२०१, संचेती शाळेजवळ, मुळ रा. बोदेगाव ता.परळी जि. बीड) यांनी चाकण महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सतिष भानुदास जाधव (मुळ गाव मेराळ सांगवी ता. गंगाखेड जि.परभणी; सध्या रा .कुरुळी, कुरुळी फाटा, पुणे नाशिक हायवे रोडलगत मंगलमुर्ती कॉलनी शैलेष पाटील सिंगल रुममध्ये ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल करीत त्यास अटक करण्यात आली आहे. चाकण महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















