न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२२) :- दुचाकीवरुन महाळुंगे गावच्या दिशेकडून चाकणच्या दिशेने घराकडे येत असताना समोरुन येणा-या सीडी डिलक्स (एमएच ५० बी ८५११) क्रमांकाच्या दुचाकीवरील वाहन चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपने वाहन चालवले. फिर्यादीच्या मित्राच्या दुचाकीला (एमएच ४४ एए २६४५) जोरात धडक दिली. त्यात तो जखमी झाला.
आरोपीने जखमीस उपचारासाठी डॉक्टरकडे न नेता अपघाताची माहिती जवळच्या पोलीस स्थानकात न देता घटनास्थळावरून पोबारा केला. तातडीचा उपचार न मिळाल्यामुळे रोहित आसाराम शिनगारे या फिर्यादीच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना (दि. १९) रोजी साडे अकराच्या सुमारास चाकण-तळेगाव रोडवर, हनुमान मंदिरा समोर, ग्रामपंचायत जवळ, खराबवाडी, खेड येथे घडली. फिर्यादी विष्णू दशरथ राठोड (वय २३ वर्षे रा. विकी पानसरे यांचे भाड्याचे खोलीत, देशमुख आळी, चाकण ता. खेड) यांनी चाकण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीडी डिलक्स (एमएच ५० बी ८५११) वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. चाकण म्हाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















