न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण कारवाई केली जाते. या पथकांतील कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यास ते जखमी होऊ नये, म्हणून पालिकेने १ हजार १०० रुपये दराने तब्बल ५०५ हेल्मेट खरेदी केले आहे. त्यासाठी ५ लाख ५५ हजार ५०० रुपये खर्च करण्यात आला आहे.
पालिकेने अतिक्रमण विरोधी पथके सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी पथकात राज्य शासनाच्या कमांडो जवानाची नियुक्ती करण्यात आली,
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास दोन पिंजरा वाहने खरेदी करण्यात आली आहेत. तसेच, विविध प्रकारची यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता, पथकातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट खरेदी करण्यात आले आहेत. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.


















