- पैसे परत मागितले असता दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२२) :- प्लॉट कमी दरात देतो म्हणत फिर्यादीकडुन काम चालु होण्याअगोदरच आरोपींनी ६ लाख रुपये उकळले. फ्लॅटबाबत व पैशाबाबत विचारणा केली असता आरोपींनी फिर्यादीला उडवा-उडवीची उत्तरे देत फिर्यादीच्या पैशांचा अपहार करुन फिर्यादी यांची एकुण ६ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केली.
आरोपीच्या घरी जाऊन फिर्यादीने पैशांची मागणी केली असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार (दि. २४/०२/२०११ ते आजतागायत सर्व्हे नंबर १५९/२ माळीनगर, देहुगांव येथील बांधकाम साईडवर घडला.
फिर्यादी रघुनाथ भिकोबा कुंभार (वय ६५ वर्षे रा. नंबर १४४ सर्व्हे नंबर ३४/१ अभंगनगरी सोसायटी देहुगांव गाथा मंदीर रोड देहुगांव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अनिल जनार्धन सरोदे (रा. पंचशीलनगर, धनकवडी), भारत नरहरी पवार (रा. इंदीरानगर धनकवडी) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.