न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२२) :- भारतीय संस्कृतीत गायीला विशेष महत्त्व आहे. विशेषतः वसुबारसेला तिचा सन्मान केला जातो. कुदळवाडी येथील दिनेश लालचंद यादव मित्र परिवारराच्या वतीने वसुबारसनिमित्त सामूहिक गोमाता पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
निशा दिनेश यादव आणि उपस्थित भाविकांनी गोठ्यातील गाय आणि वासराचे यथासांग पूजन करीत वसुबारस साजरी केली. यावेळी परिसरातील महिला भगिनी, नागरीक बांधव उपस्थित होते.


















