- चौघांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२२) :- पायी चालत असताना रस्त्याच्या बाजुला मोटार सायकलसह थांबलेल्या चार अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या जवळ येवुन फिर्यादीच्या पाठीवरील बॅग पकडली. फिर्यादीस ” तेरे पास जो भी है जल्दी निकाल ” असे म्हणाले. फिर्यादी यांनी नकार दिला असता त्या इसमांनी फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडावर लोखंडी तलवार मारुन जखमी केले.
फिर्यादीच्या पॅन्टच्या खिश्यातील पैशाचे पाकीट त्यातील १००० रु रोख रक्कम व १२००० किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल व २००० किंमतीचे बॅगमधील इतर सामान असे एकुण १५००० रुपये किंमतीचे साहीत्य जबरदस्तीने हिसकावुन घेत, मोटर सायकलवरुन आकुर्डीच्या दिशेने पळ काढला. ही घटना (दि. २०) रोजी रात्री ११.४० च्या सुमारास थरमॅक्स चौकाजवळील आयसीआयसीआय बँक एटीएम समोर, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी विजयकुमार मुन्नालाल बघेल (वय ३० वर्षे, रा. परदेशी चाळ, खंडोबा मंदीर रोड, भोसरी, मुळ गाव बी/५२, बीएसएफ कॉलनी, महाराजपुरा, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी काळया रंगाच्या मोटार सायकलवरील ४ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.