न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२२) :- रस्त्याच्या कडेला चारचाकी गाडी पार्क करून फिर्यादी मित्राबरोबर बोलत होते. त्यावेळी ओळखीचा मुलगा आरोपीने त्यांना गाडी काढण्यास सांगितले. फिर्यादीने गाडी काढतो असे सांगूनही आरोपीने फिर्यादीला ” आता लगेच गाडी काढ असे म्हणाला. त्यावर फिर्यादीने ” तुला काय करायचे ते कर, गाडी काढणार नाही, मी तुझ्या हॉटेलच्या समोर गाडी लावली नाही ” असे सुनावले. त्यानंतरही आरोपी ” तुम्ही गाडी काढा, ” असे फिर्यादीला म्हणाला. त्यावर फिर्यादी मी गाडी काढणार नाही असे आरोपीला म्हणाले.
आरोपीने रागात येऊन साथीदारांना बोलावून घेऊन फिर्यादी व त्यांच्या मित्राला स्टीलच्या रॉडने व लाकडी दांडक्याने व लाथा बुक्यांनी मारून गंभीर जखमी केले. हा प्रकार (दि. २९) रोजी पहाटे तीनच्या सुमारास ईराणी चहासमोरील रस्त्यावर, हिंजवडी फेज २ येथे घडला.
फिर्यादी अजिंक्य रमेश खडतरे (वय ३० वर्षे, रा. सारथी सोव्हीरंग सोसायटी, बिल्डींग नंबर ए/२, फलॅट नंबर,२०२, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अजित सदाशिव होके (वय २५ वर्षे रा. निगडी), प्रशांत प्रताप कदम (वय २५ वर्षे रा. थेरंगाव) व इतर दोन अनोळखी मुले यांच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपी ताब्यात आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















