- २६ दिवसांत तब्बल १६ हजार ४९५ वाहनांची नोंदणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२२) :- दिवाळीनिमित्त शहरवासियांनी जोरदार वाहन खरेदी केली आहे. यामुळे यंदा आरटीओची दसरा-दिवाळी खूपच जोरात झाली आहे. गेल्या २६ दिवसांत तब्बल १६ हजार ४९५ वाहनांची नोंदणी झाली आहे. यामधून पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाला ९३ कोटी ७३ लाख ९७ हजार ९७६ रूपयांचा महसूल मिळाला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.
वाहनांच्या नोंदणीत ९ हजार ७५६ दुचाकी, ५ हजार १६१ कार तर इतर १ हजार ५७७ वाहनांचा समावेश आहे. बुकिंग करून झाल्यावर दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी वाहने शोरूममधून नेली. सर्वच वाहनांची यावर्षी खरेदी मोठ्या प्रमाणात झाली.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दसरा आणि दिवाळीनिमित्त कारसाठी नवीन मालिका सुरू केली होती. या मालिकेत २ हजार ५७४ नागरिकांनी पसंती क्रमांक घेतले. यामधून आरटीओला २६ दिवसांत २ कोटी २४ लाख ८९ हजार रूपयांचा महसूल मिळाला आहे..
















