- रिक्षा चालकांसह आठ जण जखमी; वाहनांचे मोठे नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शुक्रवार (दि. २८) आणि शनिवारी (दि. २९) रोजी बेदरकारपणे वाहनं चालवीत दोन रिक्षा आणि एका दुचाकीला पाठीमागून धडक देत घटना स्थळावरून आरोपींनी पलायन केल्याचा तीन घटना घडल्या आहेत.
पहिली घटनेत फिर्यादीसह त्यांचे आई-वडील, दाजी हे त्यांच्या रिक्षातुन (रिक्षा नं. एमएच १२ टियु ६८९३) प्रवास करीत होते. अज्ञात मोठया वाहनाने भरधावपणे फिर्यादीच्या रिक्षास पाठीमागुन धडक दिली. त्यात रिक्षा पलटी होवुन सर्वांना दुखापत झाली. रिक्षाचे नुकसान करुन आरोपी वाहनचालक अपघातस्थळी न थांबता निघुन गेला. हा प्रकार (दि. २८) रोजी रात्री नऊच्या सुमारास सुतारवाडी विनताजवळ, मुंबई-बैंगलोर हायवे रोडवर, सुतारवाडी येथे घडला. फिर्यादी ३८ वर्षीय महीलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अज्ञात वाहन चालक (नाव व पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत फिर्यादी, फिर्यादीचे पती व मुलगी हे त्यांच्या डिस्कव्हर गाडी (क्र. एम.एच.१४ ई.ए.९१९८) वरुन प्रवास करीत होते. दरम्यान बी.एम.डब्ल्यु कार (क्र. एम.एच.१४ के.बी. ६०२१) यावरील चालकाने फिर्यादीच्या मोटार सायकलला पाठीमागुन जोरात धडक दिली. या अपघातामध्ये फिर्यादीच्या पाठीस फ्रेक्चर झाले. फिर्यादीच्या पतीस मुका मार लागला आहे. ही घटना (दि.२८) रोजी साडेसात ते पावणेआठ च्या दरम्यान देहुगाव, चिंचोली रोडवर, छ. शिवाजी महाराज पुतळ्यापासुन पुढे घडली. फिर्यादी ३५ वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी बी.एम.डब्ल्यु कार (क्र. एम.एच.१४ के.बी. ६०२१) वरील अनोळखी चालक (संपुर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत भरधाव वेगात, हयगयीने व अविचाराने आरोपीने स्वतः कार चालवली. समोरील फिर्यादीची रिक्षा (एम.एच. १४ जे.पी. ५७९०) हीस पाठीमागुन जोरात धडक दिली. अपघातात रिक्षाचालक फिर्यादी यांना किरकोळ दुखापत झाली. रिक्षाचे नुकसान झाले. अपघाताची माहिती न देता आरोपीने घटना स्थळी न थांबता पलायन केले. ही घटना (दि. २९) रोजी पाच वाजून ४० वा. नेहरुनगर, झीरो बॉईज चौक, नेहरुनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयाजवळ घडली. फिर्यादी नामदेव बब्रुवान टमके (वय ४० वर्षे, रा. तापकीर नगर, गंधर्व नगरी, गणेश कॉलनी, साळुंके याची खोली, मोशी) यांनी पिंपरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी पांढऱ्या रंगाची होंडाई वेरना (कार नंबर माहीत नाही) त्यावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















